लहानपण
लहानपण म्हणजे
स्वच्छ, सुंदर अन नितळ पाणी
खळखळाट असतो खरी थोडा
पण मृदू वाटते ती वाणी
लहानपण म्हणजे
उंच उंच आभाळ
चिमणी परी गिरक्या घेते
स्वप्न त्याचे किती लव्हाळ
लहान त्यांचा मनात
प्रश्न असतात किती अपार
कधी कधी सुटत नाही
जरी असतात शब्द दोन अन चार
लहानपण म्हणजे सुका मेवा
चव नाही त्याची कुठल्याच वयाला
म्हणून तुकाराम म्हणाले ना
" लहान पण देगा देवा.... मुंगी साखरेचा रवा "
" लहान पण देगा देवा.... मुंगी साखरेचा रवा "
खरंच आपले लहानपणीचे फोटो पहिले के परत आपणच आपला हेवा करतो आणि म्हणतो कि अरे यार मी ना लहानच राहायला पाहिजे होतो म्हणजे हेवे दावे .......तुझा माझा.......मी माझाच .....मी कसा तो तसा हे राहिलाच नसते न
आता आपण आपल्या मुलाचे फोटो पाहून कौतुक करतो ....त्यांची ती बडबड, खोड्या याना आपण सहन करतो...... का? कारण आपण स्वतःलाच त्यांच्या जागी शोधतो
शोधा बघा आपल लहानपण त्यात दिसतंय का?
सौ नयना नितीन जंगले
विद्युत अभियांत्रिकी विभाग
No comments:
Post a Comment