Thursday, August 6, 2020

मैत्री


मैत्री

मैत्री शब्द किती गोड़ आहे ना ? 
    मैत्री म्हटलं कि लहानपणापासून सर्व मित्र अन मैत्रिणी अलगद क्षणार्धात एक चित्र बनून समोर येतात आणि मग त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, गप्पा, खोड्या या मध्ये आपण रंगून जातो.  मित्र आणि मैत्रिणी अशा व्यक्ती असतात ज्यांच्याजवळ आपण आपल्या मनाचे सगळे दरवाजे उघडतो आणि सुख दुःख वाटतो. त्याला न पटणारी गोष्ट सुद्धा निव्वळ आपल्या मानधरणीसाठी पटवून घेणारा मित्रच असतो. आपल्या प्रत्येक चुकीच्या किंवा बरोबर गोष्टीलाही वाटून घेणारा आणि त्यासाठी मिळणाऱ्या शिक्षेलाही सामोरा जाणारा मित्रच असतो. 
    आनंदाची कुठलीही गोष्ट सांगावीशी वाटली आत आपण पहिले मित्राला शोधतो आणि मज्जा लुटतो तर आपण दुःखात असताना आपल्याला शोधून समाजवणारा, बल देणारा आणि पाठीशी उभा राहणारा शुद्ध एक मित्रच असतो बरं का......
    खरंच मित्र आणि मैत्री किती छान असते ना हे मित्र असल्याशिवाय नाही कळत.....
मी तर म्हणते मैत्री हे बासरी सारखी असते..बासरी म्हणजे काय हो ? एक शुष्क वेळूची पोकळ नली,छिंद्रांकित, कुणीतरी सावधपणे फुंकर घालावी लागते आणि छिद्र जपून हळुवार बोटानी पेलवल्ली कि मनाचे उत्तम सूर उमटतात.....तसाच आपल्या मनाच्या बासरीच्या पोकळीत हळूच फुंकर घालून सुखदुःखांना पेलवणारा आपला मित्रच असतो.......असा मित्र आपल्या आयुष्यात आला कि हृदयांतरीच्या व्यथा देखील पळून जातात आणि आपलं आयुष्य सुंदर बनत ..म्हणूनच मित्र मैत्रिणींनी भरलेल असं आपला भावविश्व असावं ज्यात खोडकरपणा, सुखदुःखाची देवाणघेवाण असावी पण राग, द्वेष आणि मत्सर नसावा .....

मैत्रीच्या त्या क्षणांमध्ये 
असतो एक वेगळाच सुवास 
कारण तो ऋतूच
 असतो वेगळा मुळात 
..............................
मित्र दूर गेले तरी 
मैत्रीचे क्षण मरत नाही 
भविष्यात आधार देत राहतात 
संकटांमुळे डगमगू देत नाही .....



प्रा. नयना नितीन जंगले 
विद्युत अभियांत्रिकी विभाग.
Inspirational And Motivational Friendship Day Quotes And Pictures ...


4 comments:

  1. Nice ...and so true..!

    ReplyDelete
  2. Nice.... खरय मित्र ही एक मोठी संपत्ती आहे की जी जिवापाड जपली पाहिजे. 🙏🙏

    ReplyDelete
  3. Nice.... खरय मित्र ही एक मोठी संपत्ती आहे की जी जिवापाड जपली पाहिजे. 🙏🙏

    ReplyDelete
  4. Nice.... खरय मित्र ही एक मोठी संपत्ती आहे की जी जिवापाड जपली पाहिजे. 🙏🙏

    ReplyDelete