![]() |
| शिक्षकदिना निमित्त सर्व शिक्षकांना समर्पित… |
शिक्षकांनी काय शिकविले
शिक्षकांनी इतिहास, भूगोल, विज्ञान, भाषा, गणित तर शिकवलेच,
पण फार महत्वाचे म्हणजे, आयुष्य जगायला शिकविले.
पटवून दिले, की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर करायला शिकविले.
बाहेर तू 'राजपुत्र' असशील, पण इथे मात्र माझा विद्यार्थी आहेस,
तुझ्या आयुष्याचा रथ तुलाच चालवायचा आहे, तूच सारथी आहेस
आकाशाची उंची मोजताना पाय जमिनीवर ठेवायला शिकविले
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर करायला शिकविले.
कुणाविषयी राग, लोभ, द्वेष, मत्सर बाळगण्यास प्रतिबंधीत केले
निंदा, अवहेलना, अपमान यांचे उत्तर प्रगतीने देण्यास सक्षम केले
चिकाटीने परिश्रम करण्यास व समाधानी राहायला शिकविले.
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर करायला शिकविले.
चूक काय, बरोबर काय, खरे काय, खोटे काय याचा परिचय केला.
योग्य काय, अयोग्य काय, न्याय काय, अन्याय काय उघड केले.
प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घ्यायला शिकविले
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर करायला शिकविले.
यशाने हुरळून जाऊ नको, आणि अपयशाने खचित नको होऊ,
आत्मविश्वास जरूर असावा, परंतु दुसर्यांचा अविश्वास नको होऊ
माणुसकी जतन करून माणसे जोडीत जायला शिकविले
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर करायला शिकविले.
प्रा. डॉ. रवींद्र मुंजे
क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक
७ सप्टेंबर २०२०

No comments:
Post a Comment