Tuesday, August 4, 2020

A poem By Dr. Ravindra Munje AAI BABA




ही कविता मी माझ्या आई-वडिलांना अर्पण करतो.

उघड्या डोळ्यांनी बघितलेलं एक स्वप्न होतं,
त्यासाठीचं दिवस रात्र रब-रब राबणं होतं.
एक खूणगाठ पक्की होती, काहीतरी करायचं,
यश मिळो अगर न मिळो, परत नाही फिरायचं.

स्वकर्तृत्वावर बेभरवश्याच विश्वास होता,
ध्येय सिद्धीचा अविरत ध्यास होता.
ठरवलं होतं, गर्दीत वेगळं दिसायचं म्हणून,
परंतु त्याच गर्दीची ओळख बनून.

आता मनात पेटलेली एक ज्योत आहे,
जी वादळात जास्तच प्रकाशमय होतं आहे.
ठरवलंय, त्या प्रकाशाने अंधाराला दूर करायचं 
आणि मी बघितलेलं स्वप्न हिस्से करून वाटायचं.

--प्रा. डॉ. रवींद्र मुंजे, नाशिक

No comments:

Post a Comment