![]() |
व्यथा भारतमातेची
आजसुद्धा आपण स्वातंत्र्याची ती मंगलमयी पहाट आपण आनंदात साजरी करतो. क्षणभर का होईना स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या वीर देशभक्तांना आपण आदरांजली वाहतो. या स्वातंत्र्याचा आनंद आपण मागील अनेक वर्षे उपभोगत आहोत. अश्या सोनेरी स्वात्रंत्र्याच्या आनंदाबरोबर सुद्धा आपल्या नजरेसमोर काही भयानक आणि विदारक क्षण डोळ्यासमोर तराळतात आणि आपले हृद्य आपण काय हरवलंय याचा शोध घेत असते.
स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद जसा आपण सर्वांनां आहे तसेच तो आपल्या भारतमातेला पण आहे. या भारत मातेच्या हृदयात येणारे काही विचार मी आपण समोर मांडण्याचा अल्पसा प्रयन्त्न करत आहे.... आपण तो समजूत घ्या हीच अपेक्षा करतो..
अजूनही आठवते मला ती स्वातंत्र्याची रात्र अन तो क्षण...
सारं जग झोपलेलं असताना त्या वेड्या देशभक्तांचं जागरण ।।धृ।।
फासावर जाणारे ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू,
मज स्वात्रंत्र्यासाठी त्यांनी तयारी त्यांची जवानी ।
अजूनही कान बधिर करतात जालियनवाला बागेतील ते चित्कार,
तेंव्हा अश्रुनी नकळत भिजते या डोळ्यांची पापणी ।।१।। अजूनही....
अशा कितीतरी दीपमाळा विझल्या माझ्या मुक्ततेसाठी,
मन अजूनही आहे भरलेलं अशा दिव्यांच्या प्रकाशानी ।
डोळ्यासमोर एक एक वीर झगडत होता या मातेसाठी,
आणि मी अभागी हात हि फिरवत येत नव्हता पाठीवरुनी ।।२।। अजूनही....
अखेर तो क्षण आला आणि मी बंधमुक्त झाले,
तुटली बंधने साखळदंडांनी आणि विखुरली कड्याकड्यानी ।
आई होऊन परत सर्वांनां मी या कुशीत घेतले,
आणि हृद्य माझं काबीज केले बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांनी ।।३।। अजूनही...
मी पुन्हा भरारी घेऊ लागले जसे पक्षी उडू लागतात,
पण अचानक वादळात माझ्या पंखाची झाली विभागणी
अजूनही रोज खपल्या निघून जखमा चिघळतात ।
रग लागताच ते हुतात्मे किंचाळतात माझ्या हृदयातून ।।४।। अजूनही ...
आज रोज पहाटे इथे जगण्याची वाताहत,
रोज भिजते मी भावाभावाने सांडलेल्या रक्तानी ।
सर्वच माझी लेकरे कुणा कुणाला देऊ मदतीचा हात,
पारतंत्र्यापेक्षा आज सर्व बंधनात गेले जखडूणी ।।५।। अजूनही ...
वैभव आणि मायेच्या पिंजऱ्यातील तो सोनेरी पक्षी
तर एकीकडे ती दीनदुबळ्याची भाकरीसाठी किंकाळणी ।
अनाथ मुले, माय भगिनी यांची अब्रू ना कोणीही रक्षी,
मन विषण्ण झाले आहे हा सर्व देखावा पाहुनी ।।६।। अजूनही...
स्वकीयांच्या वाराने झाली माझ्या वस्त्राची लक्तरं,
आता काहीच वाटत नाही अश्रूही चाललेत थिजूनी ।
बोथट जातायत भावभावना वाटतोय मायेचा पाझर,
तरीही वेड मन वाट पाहताय जो फोडेल पाझर पाषाणातुनी ।।७।। अजूनही...
तरीही स्वातंत्र्याची ती रात्र आणि तो क्षण,
अजूनही तसाच लख्ख आरशारखा आठवतो ।
पुन्हा पुन्हा येणार तो स्वातंत्र्य दिन,
परतंत्र केलं स्वकीयांनी तरी आनंद देऊन जातो ।।८।। अजूनही...
गणेश नंदकुमार जाधव
सहाय्यक प्राध्यापक
विद्युत अभियांत्रिकी
क का वाघ अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय
नाशिक ४२२००३

No comments:
Post a Comment